सिमेंटचे खांब न बसवल्याने रस्ता अरुंद; अतिक्रमण प्रयत्नांमुळे ग्रामस्थांची चिंता वाढली..
⚡सावंतवाडी ता.११-: धाकोरे गावातील होळीचे भाटले ते अशोक साटेलकर मार्गे रघुनाथ मुळीक घरापर्यंतचा २३ क्रमांकाचा सरकारी रस्ता अपूर्ण कामामुळे पुन्हा अडचणीत सापडला आहे. गावकऱ्यांनी आंदोलन, निवेदनं आणि उपोषणं करून या मार्गासाठी दीर्घ लढा दिला असला तरी अद्याप सिमेंटचे खांब नीस पुन्हा बसवले गेलेले नाहीत. परिणामी रस्ता पुन्हा अरुंद होऊन अडथळ्यांनी भरल्याच्या तक्रारींनी ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत.
दरम्यान मोजणी व अतिक्रमण हटविण्याची कारवाई ३ सप्टेंबर रोजी भू-अभिलेख विभागामार्फत रस्त्याची अधिकृत मोजणी करण्यात आली होती. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामपंचायत धाकोरेच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.
या कारवाईत जेसीबीद्वारे बेकायदेशीर बांधकामे काढून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केलं होतं.सिमेंटचे खांब अद्याप बसवलेले नाहीतमात्र कारवाई दरम्यान काही ठिकाणी सिमेंटचे खांब तात्पुरते काढण्यात आले होते. आजतागायत ते पुन्हा बसवले गेलेले नसल्याने रस्ता पुन्हा अरुंद झाला आहे. काही ठिकाणी अतिक्रमणाचे प्रयत्न होत असल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे.
