मालवणात ११ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम…

⚡मालवण ता.०७-:
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तथा भारतीय बौद्ध महासभा, तालुका मालवण व शहर शाखा, मालवण यांच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता लोकनेते आर. जी.चव्हाण सभागृह, वायरी-मालवण येथे आयोजित केला आहे.

यानिमित्त दुपारी १ ते २ वाजेपर्यंत भीमगीत कार्यक्रम, २ वा. बुद्धवंदना व पूजापाठ, स्वागतगीत (भारतीय बौद्ध महासभा महिला मंडळ, मालवण), बौद्ध धम्मदीक्षा होणार आहे. दुपारी २.३० वा. जाहीर सभा होणार असून प्रमुख मार्गदर्शक भारतीय कर्मचारी संघ, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. आर. ओहोळ हे बाबासाहेबांनी बौद्धधम्मच का स्वीकारला? धम्म परिवर्तन झाले, धम्म आचरणाचे काय? या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते पी. के. चौकेकर, स्वागताध्यक्ष म्हणून मालवण तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख बबन मालवणकर तसेच कोकण विभाग प्रभारी सुधीर धामणकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंदकुमार धामापूरकर, महासचिव प्रवीण कदम, कोषाध्यक्ष सुहास कदम, उपाध्यक्ष पर्णवी जाधव, संस्कार विभाग प्रमुख संजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, निवृत्त नायब तहसीलदार आनंद मालवणकर, तालुका मुख्य संघटक नरेंद्र पेंडुरकर, तालुकाध्यक्ष महिला समीक्षा मालवणकर, जिल्हा मीडिया प्रमुख बबन मालवणकर हे उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव व सचिव महेश कोळंबकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page