*मालवण-सुकळवाड मार्गावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची संयुक्त कारवाई_
*💫मालवण दि.०८-:* मालवण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना खबरदारी नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे व गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी शनिवारी दुपारी मालवण सुकळवाड मार्गावरील काही ग्रामपंचायत क्षेत्रात अचानक भेटी देत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. एका ठिकाणी मंदिरात लग्न सुरू होते. त्या ठिकाणी तहसीलदार यांनी भेट देत लग्नाची परवानगी घेतली असल्याबाबत खात्री केली. लग्नाची परवानगी होती त्यानुसार लग्न सुरू होते मात्र काही व्यक्तींनी मास्कचा वापर केला नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुकळवाड मार्गावर ११ नंतर काही भाजी व अन्य विक्रेते यांचे व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी विनाकारण गर्दी करून नागरिक एकत्र थांबल्याचे दिसून आले. त्यांना कडक शब्दात सूचना देण्यात आली. यादरम्यान काही ग्रामपंचायत कार्यालयात भेटी देऊन सूचना देण्यात आल्या. यावेळी सहायक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, कृषी अधिकारी गोसावी, विस्तार अधिकारी जाधव यासह पोलीस व होमगार्ड पथक सहभागी होते.