*💫वैभववाडी दि.०८-:* :एप्रिल, मे महिन्यात वन्य प्राण्यांचा वावर मनुष्य वस्तीमध्ये वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील वन्य प्राणी विहिरीमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.7 मे रोजी नाधवडे इस्वालकर येथील विहिरीत पडून सांबर (नर)चा बुडून मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात एडगाव पास्टेवाडी येथील खाजगी शेत विविरीत जंगली गवरेडा पडला होता.त्यानंतर एप्रिल महिन्यात खांबाळे रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे इंजिन खाली गवा रेडा सापडून मृत्यू झाला होता. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीचा सांबराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बाहेर काढण्यात आला.त्यानंतर पशुधन विकास अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. या वेळी वैभववाडी वनपाल एस.एस.वागरे,वनरक्षक खांबाळे ए. एच.काकतीकर,करूळ वनरक्षक उत्तम कांबळे,त.ना.लोखंडे,व नाधवडे ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो:नाधवडे येथील विहिरीत पडलेला सांबर
*नाधवडे येथे विहिरीत पडून सांबराचा मृत्यू*
