आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश..
⚡कुडाळ ता.०६-: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून १८ नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी खालील प्रमुख भागांमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
यात कुडाळ तालुक्यात डिकवल वरचीवाडी, कुणकवळे बागवाडी, गोळवण सावरवाड, तळगाव शेळवणेवाडी, काळसे परबवाडी, कट्टा बाजारपेठ, कुडाळ मच्छीमार्केट, पिंगुळी गुढीपूर, शासकीय तंत्रनिकेतन, देवली वाघवणे, जांभवडे कुंभारवाडी, मांडकुली भोईवाडी, निवजे, कसाल बाजारपेठ. मालवण तालुका: आचरा हिर्लेवाडी, मालवण धुरीवाडा, चेंदवन वेलवाडी, वालावल आर्कचापूल, आंबेरी गोसावीवाडी, वेताळ बांबर्डे कदम वाडी. या १८ ठिकाणच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कुडाळ-मालवण तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार आमदार निलेश राणे यांनी या ट्रान्सफॉर्मरसाठी पाठपुरावा केला. आमदार राणे हे वीज यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तत्पर असून, लवकरच उर्वरित आवश्यक कामांनाही मंजुरी मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. या नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे या परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत व स्थिर होण्यास मदत मिळेल.
