⚡मालवण ता.०६-:
कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशीनरीचे दिले जाणारे भाडे हे जेसीबी मालकास परवडणारे नसल्याने यापुढे जेसीबी मशीनरीचे भाडे नव्या दराने घेण्याचा निर्णय आचरा दशक्रोशीतील जेसीबी मालक संघटनेच्या बैठकित घेण्यात आला
आचरा दशक्रोशीतील जेसीबी मालक संघटनेची बैठक आचरा येथे संपन्न झाली . या बैठकिला दशक्रोशीतील जेसीबी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा करत असताना प्राधान्याने काही महत्त्वाच्या मुद्द्यावर ठराव घेण्यात आले .
यामध्ये जेसीबी मशीनरी कामाचा प्रति तासाचा दर सर्वसामान्य कामासाठी १२००/- रुपये, फक्त लोडरचेच काम असल्यास प्रति तासाला १४००/- रुपये आणि ब्रेकर चे काम असल्यास १७००/- रुपये असा दर सर्वानुमते ठरविण्यात आला. तसेच शासकीय किंवा वैयक्तिक कामासाठी जे ठेकेदार बाहेरून जेसीबी किंवा पोकलेन भाड्याने घेऊन येतात आणि इथे आपल्या कामाबरोबरच बाहेरची कामे कमी दराने करतात आणि त्यामुळे ईथल्या स्थानिक मशिनरीधारकाला काम मिळणे कठीण होऊन बसत आहे. त्यामुळे या बैठकीत ज्या ठेकेदारांना जेसीबी किंवा पोकलेन अशा मशिनरी कामासाठी आवश्यक असते अशा ठेकेदारानी स्थानिक लोकांच्या मार्फत मशिनरी घेऊन आपली कामे करावीत. त्याशिवाय येथील स्थानिक लोक जेसीबी सारख्या मशिनरी विकत घेऊन बाहेरील लोकांना भाड्याने करारावर चालविण्यास देतात. साहजिकच अशा सर्व गोष्टींमुळे सुद्धा स्थानिक मशिनरी मालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्यामुळे अशा गोष्टी निदर्शनास आल्यास त्यावर संघटनेमार्फत योग्य ती कारवाई केली जाईल असे ठरविण्यात आले
या बैठकीसाठी जेसीबी संघटनेचे अध्यक्ष राजू परुळेकर,बाबू हडकर दुर्गाप्रसाद तुळपुळे, भाऊ हडकर, भालचंद्र माटवकर विनोद गवळी, बाबू बाईत, अजय साटम, प्रकाश मेस्त्री, धुळाजी कर्पे, किशोर खोत, माने, गणेश तोंडवळकर यांच्या सहित तीस ते पस्तीस जेसीबी आणि पोकलेन मालक उपस्थित होते.
