पालंकमंत्री उदय सामंत_
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत.मोठ्या संख्येने वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे रात्री १२ वाजल्यापासून १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन ७ दिवसांचा जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.यावेळी सर्व समावेशक राजकीय नेत्यांशी आम्ही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा केली आहे.त्याचा पाठींबा आहे. खा.विनायक राऊत, खा.नारायण राणे, आ.दीपक केसरकर,आ.नितेश राणे,आ.वैभव नाईक यांच्या सह सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली आहे.त्यामुळे हा कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. कणकवली तालुका जनता कर्फ्यू होता,पण उद्या आणि परवा हे दिवस शिथिलता असेल,असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.