नगरसेवक अँड परिमल नाईक यांची मागणी*
*💫सावंतवाडी दि.०८-:* सध्या जिल्ह्यात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच बेड, औषध, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता जाणवत आहे. तसेच लसीकरण कार्यक्रमात देखील गोंधळ होत आहे. या सर्वाचा त्रास सामान्य नागरिक आणि रुग्णांना बसत आहे. त्यामुळे या सर्वांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक पदीची तातडीने नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी केली आहे.