‘वीरांगना वेशभूषा’ स्पर्धेत सौ. मिताली कोरगावकर व मिताली मसुरकर प्रथम…

सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन सप्ताह सांगता समारंभ प्रसंगी आयोजन..

⚡मालवण ता.०३-:
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५ – २६ निमित्ताने महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य संघटना मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वीरांगना- भारतातील शूर स्त्री योद्ध्या’ वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत खुल्या गटात सौ. मिताली प्रशांत कोरगावकर यांनी प्रथम क्रमांक तर कनिष्ठ महाविद्यालय गटात मिताली मसुरकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

भारतीय इतिहासातील किल्ल्यांशी निगडित अनेक स्त्रियांनी शौर्य, त्याग आणि पराक्रमाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सिंधुदुर्ग महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, टॅक्स कन्सल्टंट हेमंत वालकर, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, स्वराज्य संघटना मालवणच्या संस्थापक सौ. शिल्पा खोत, साहित्यिका वैशाली पंडित, नाट्य कलावंत सौ. शुभदा टिकम, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. उज्वला सामंत आदी उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पर्यटन सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या ‘किल्ले वाळूशिल्प’ स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.

यावेळी गुरुनाथ राणे यांनी पर्यटन सप्ताहानिमित्त अतिशय स्तुत्य असा राष्ट्रीय कार्यक्रम महाविद्यालयाने साजरा केला असल्याचे सांगत किल्ले प्रेरणोत्सव समितीला यामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. सौ. शिल्पा खोत यांनी उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील एकमेव असा उपक्रम आहे. भारत ही वीर पुत्रांप्रमाणेच वीरांगनांची देखील भूमी आहे, असे सांगितले. वैशाली पंडित यांनी वीरांगना वेशभूषा ही अभिनव संकल्पना असून महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशातही अशाप्रकारची स्पर्धा झालेली नसावी, अशाप्रकारचा पर्यटन सप्ताह वर्षानुवर्षे सुरू रहावे, अशी अपेक्षा असल्याचे सांगितले. शुभदा टिकम यांनी वेशभूषा व रंगभूषा यासंबंधी सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत खुल्या गटात प्रथम- मिताली कोरगांवकर, द्वितीय- श्रावणी गावडे, तृतीय- जान्हवी परुळेकर, उत्तेजनार्थ प्रथम- अर्चिता राणे, उत्तेजनार्थ द्वितीय स्नेहल चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम- मिताली मसुरकर, द्वितीय – मैथिली गावडे, तृतीय- संचिता बागडे, उत्तेजनार्थ प्रथम- सृष्टी कुमठेकर, उत्तेजनार्थ द्वितीय- गार्गी मालवणकर यांनी यश मिळविले.

सर्व विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेची सर्व बक्षिसे स्वराज्य संघटनेच्या सौ. शिल्पा खोत यांनी पुरस्कृत केली होती. तसेच गिरीजा परुळेकर या लहान मुलीला स्पर्धेत सादरीकरण केल्याबद्दल शिल्पा खोत वीरांगना पुरस्कार रु. ५०० व सन्मानचिन्ह असे विशेष बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण वैशाली पंडित व शुभदा टिकम यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, समन्वयक डॉ. उज्वला सामंत, आय. क्यू. ए. सी. प्रमुख डॉ. सुमेधा नाईक, प्रा. प्रमोद खरात, डाॅ. एच. एम. चौगले, डॉ. एम. आर. खोत, डॉ. देविदास हारगिले, प्रा. स्नेहा बर्वे, अन्वेषा कदम, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक – कर्मचारी वर्ग तसेच श्रावण गवळी, अस्मिता रावराणे, शांती तोंडवळकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. उज्वला सामंत यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page