घावनळ्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा खून…

गोठोस येथील २३ वर्षीय युवकाला अटक:५ दिवसांची पोलीस कोठडी..

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे येथून २ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाला आहे. गोठोस+-मांडशेतवाडी येथील कुणाल कृष्णा कुंभार (वय २३) यानेच वाडोस-बाटमाचा चाळा येथून १०० मीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन स्थळी गळा आवळून तिचा खून केल्याचे तब्बल दोन महिन्यांनी उघड झाले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान संशयित आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याला कुडाळ पोलिसांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी ताब्यात घेतले असून आज त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता, त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

You cannot copy content of this page