विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या दिवशी सिंधुदुर्गचा वरचष्मा…

कुडाळ, सावंतवाडी, कणकवली कॉलेज उपांत्य फेरीत:उद्या होणार कोकण विभागसाठी संघाची निवड..

⚡कुडाळ ता.३०-: मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्यातील महाविद्यालयानी स्पर्धेवर वरचष्मा ठेवला. यजमान संत राऊळ महाराज महाविद्यालयासह एसपीके सावंतवाडी आणि कणकवली कॉलेजच्या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या 1 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील. त्यानंतर कोकण विभागीय संघासाठी निवड चाचणी होणार आहे.
विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलांचे 14 तर मुलींचे 11 सामने झाले. मुलींच्या संघांपैकी यजमान संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ या महाविद्यालयासह ज्ञानदीप कॉलेज खेड, एस पी के कॉलेज सावंतवाडी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी या महाविद्यालयांनी उपांत्य फेरी गाठली आहे. तर मुलांच्या विभागात यजमान संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्यासह एस पी के कॉलेज सावंतवाडी, गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी आणि कणकवली कॉलेज कणकवली यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हे उपांत्य फेरी ते सामने उद्या एक ऑक्टोबरला होणार आहेत आणि त्यानंतर अंतिम सामने होतील. त्याचबरोबर कोकण विभागीय संघासाठीची निवड चाचणी देखील उद्या होऊन त्यासाठीचा संघ निवडला जाणार आहे.

You cannot copy content of this page