*लसीकरणासाठी तालुकास्तरीय योग्य नियोजन करणे आवश्यक

*युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव राऊळ यांची मागणी*

आंबोली, ता.८;येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा फज्जा उडाला आहे. केंद्रात बाहेरच्या वेक्तीना लस मिळते आणि आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील लोकांना लस नाही.त्यासाठी तालुका स्तरीय योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली आहे. आंबोली आरोग्य केंद्रात बाहेरच्या लोकांना लस मिळते. त्यामुळे वाद होण्याचे प्रकार होतील.येथे फक्त १६० डोस आले आहेत. १६० रजिस्ट्रेशन असून फक्त ४० लोकांकडे पावती असल्याने इतरांना लस घेता आली नाही. असा सावळा गोंधळ आहे.यासाठी तालुका स्तरावर योग्य नियोजन करून या ऑनलाईन प्रणाली मध्ये आरोग्य केंद्रातील अखत्यारीतील लोकांना प्रथम प्राधान्य द्यावे.आरोग्य केंद्राला जास्त डोस तत्काळ उपलब्ध करून द्यावे असे नियोजन करावे अशी मागणी श्री.राऊळ यांनी केली आहे.

You cannot copy content of this page