कोरोना समिती व वॉर्ड समितीचा निर्णय
देवगडःप्रतिनिधी काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव व काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी पडेल ग्रामपंचायत काेराेना समिती व वाॅर्ड समिती यांच्यावतीने विविध निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये 9 मे 2021 सकाळी 6 वाजल्यापासून ते शनिवारी 15 मे 2021 राेजी रात्राै 12 वा पर्यंत गावामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी 1 आठवडयाचा जनता कर्फ्यू असल्याने आपल्या गरजेच्या वस्तू आगावू आणून ठेवाव्यात. या बंद काळामध्ये हाॅस्पीटल, खाजगी वैदयकिय सेवा, मेडिकल स्टाेअर्स चालू राहतील, दुध पुरवठा सकाळी 7 ते 8 या काळात सुरु राहिल. शासकिय कार्यालये, बँका, पेट्रोल पंप सुरु राहतील. शासनाचे नियम पाळून आंबा व्यवसाय चालू राहिल. आंबा वाहतुक करणारे ट्रक, टेम्पाे, ड्रायव्हर, हमाल यांनी गावात न फिरता स्वतंत्र क्वारंटाईन रहाणे सक्तीचे राहिल. त्यांनी गावात फिरू नये व इत्तर लाेकांमध्ये मिसळू नये. बाहेरगावाहून येणा-या लाेकांनी आरटीपीसीआर ही काेराेना टेस्ट करुनच गावामध्ये यावयाचे आहे. त्यांच्या रिपाेर्टप्रमाणे त्यांना क्वारंटाईन रहाणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला येणा-या चाकरमान्यांनी ग्रामपंचायत पडेल येथे नाेंद देणे सक्तीचे राहिल. ज्या लाेकांना सतत ताप, खाेकला, घसा दुखने इत्तर आजार असेल त्या व्यक्तींनी त्वरीत आपली काेराेना चाचणी करुन घेणे गरजेचे आहे. आपला आजार लपवू नका. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या व आपले गाव काेराेना मुक्त करण्यास मदत करा, वरील नियमांचे उल्लंघन करण्या-या व्यक्तीवर याेग्य ती कारवाई करण्यात येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी या याेजनेअंतर्गत कर्मचारी आपल्याघरी आराेग्य तपासणीसाठी येतील त्यांना सहकार्य करा असे आवाहन ग्रामपंचायत पडेल ग्रामपंचायत काेराेना समिती व वाॅर्ड समिती यांच्यावतीने करण्यात आली आहे.
