⚡कणकवली ता.२८-: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून कणकवली उपविभागासाठी अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाली आहे. ही फिरती डिजिटल फॉरेन्सिक लॅब गुन्हेगारीच्या ठिकाणीच डिजिटल पुरावे त्वरित गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे. या सुविधेमुळे तपास यंत्रणांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढून गुन्हे सोडवण्याचा वेग वाढणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
कणकवली उपविभागाला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची साथ…
