सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्व. भाईसाहेब सावंत आणि स्वर्गीय विकास सावंत यांनी चालवलेला वारसा विक्रांत सावंत निश्चितच पुढे नेतील अशा शुभेच्छा माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रांत सावंत यांना दिल्या. आमदार केसरकर यांनी आज विक्रांत चव्हाण यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.
सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भाई सावंत यांचे अलीकडेच निधन झाले. विकास सावंत यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या अध्यक्षपदा संदर्भात काल येथील आरपीटी प्रशालेमध्ये निवडणूक पार पडली यावेळी विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांची सर्वांमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर आमच्या दीपक केसरकर यांनी आज आर पी डी प्रशालेमध्ये जाऊन विक्रम सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. ते म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाटचालीमध्ये विकास सावंत यांचे भरीव असे कार्य होते त्यांची उणीव त्यांचे सुपुत्र विक्रांत सावंत हे निश्चितच भरून काढतील आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वर्गीय भाईसाहेब सावंत आणि स्वर्गीय विकास सावंत यशस्वीपणे चालवलेला वारसा विक्रांत निश्चितच पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, राजन म्हापसेकर, संदीप राणे, परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.
अजय सावंत यांनी विक्रांत सावंत यांची भेट घेत केले अभिनंदन…
