शेतकाऱ्यांची तारांबळ
*💫आंबोली दि.०७-:* आंबोली येथे आज दुपारनंतर अचानकपणे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली त्याचा फटका मोठ्या प्रमाणात भातशेती करणार्या शेतकऱ्यांना बसला. आंबोली परिसरात अनेक शेतकरी उन्हाळी भात शेती करत असतात सध्या शेतकरी भातशेती कापणी व मळणीचीच्या कामात गुंतला असून अचानकपणे झालेल्या पावसाने शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली आहे. गेले चार दिवस वातावरणात मोठी उष्णता वाढली होती त्यामुळे लोकांच्याअंगाची लाहीलाही होत होती पण आजच्या या पावसाने आंबोलीत गारवा निर्माण झाला आहे.
