बांद्यात रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…!

⚡बांदा ता.२४-: सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत बांदा परिसरातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा आणि मराठा समाज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच एसएसपीएम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या शनिवारी दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सार्वजनिक नवरात्र उत्सव निमजगा, बांदा येथे होणार आहे.

या शिबिरात सामान्य नागरिकांसाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध राहणार असून, आरोग्य तपासणी, त्वचारोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तपासणी, नेत्रचिकित्सक सेवा, मोफत लॅब टेस्ट व औषधे या सुविधा दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या खर्चाशिवाय मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी हा यामागचा उद्देश आहे.
रोटरॅक्ट क्लब आणि मराठा समाज बांदा यांनी शिक्षण, पर्यावरण आणि युवकवर्गासाठी विविध उपक्रम राबवले असून, स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने ह्या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष रोहन कुबडे व मराठा समाज बांदा अध्यक्ष विराज परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page