नट वाचनालय, बांदा यांच्या वतीने आयोजित श्रीरामरक्षा प्रकट वाचन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.२४-: डॉ. संजय काशिनाथ बर्वे, इन्सुली पुरस्कृत आणि त्यांच्या मातोश्री (कै.) श्रीमती शोभना काशिनाथ बर्वे यांच्या स्मरणार्थ तसेच झाली.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, प्रमुख पाहुणे टीजेएसबी बँक, बांदा शाखेचे शाखाधिकारी अवधूत लोके, सौ. मृणाल बर्वे, वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, संचालक शंकर नार्वेकर, महिला सदस्या सौ. स्वप्निता सावंत, जि.प. केंद्रशाळा बांदा नं. १ चे शिक्षक रंगनाथ परब, अनंत भाटे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व कै. शोभना बर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
संचालक प्रकाश पाणदरे यांनी मनोगत व्यक्त केले तर सौ. मृणाल बर्वे यांनी स्पर्धा घेण्यामागचा हेतू स्पष्ट करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. इयत्ता ३ री व ४ थी आणि इयत्ता ५ वी ते ७ वी. एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
इ. ३री व ४थी गटात राम लोके (सुधाताई कामत विद्यामंदिर, सावंतवाडी नं. २), सक्षम भिडे (व्ही.एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल, बांदा), आत्रेय आचार्य (कळसुलकर प्राथमिक शाळा, सावंतवाडी) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. ध्रुव नाडकर्णी (कळसुलकर प्रा.शाळा, सावंतवाडी) व मांगल्य बर्वे (सुधाताई कामत विद्यामंदिर, सावंतवाडी नं. २) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
इ. ५वी ते ७वी गटात सर्वज्ञ वराडकर (जि.प. केंद्रशाळा, बांदा नं. १), बाबुराव गवस (जि. प. केंद्रशाळा बांदा नं. १), दुर्गा लोके (कळसुलकर प्राथ. शाळा, सावंतवाडी) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. आराध्य आपटे (सुधाताई कामत विद्यामंदिर, सावंतवाडी नं. २) व स्नेहा राणे (जि.प. शाळा, कास नं. १) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण अनंत भाटे व सुनील नातू यांनी केले. या प्रसंगी वाचनालयाचे सहकार्यवाह हेमंत मोर्ये, सदस्य जगन्नाथ सातोस्कर, टीजेएसबी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक मंगेश कदम तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी व वाचनालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर टीजेएसबी बँक, बांदा शाखेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले.
फोटो:-
बांदा येथे आयोजित स्पर्धेचे उदघाट्न करताना मृणाल बर्वे. सोबत इतर मान्यवर. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

You cannot copy content of this page