शिक्षक राष्ट्रीय कर्तव्यास सदैव तयार;मात्र लसीकरण प्राधान्याने करून अन्य समस्या दूर करा…

शिक्षक समितीची प्रशासनाकडे मागणी_

*💫मालवण दि.०७-:* माझा सिंधुदुर्ग,माझी जबाबदारी या मोहोमेअंतर्गत गावातील घरोघरी कोव्हिडचे सर्वेक्षण करणे,प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवा देणे तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम संनियंत्रण समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे या कामासाठी मालवण तालुक्यात प्राथमिक शिक्षकांना आदेश बजावण्यात आले आहेत.या आपत्कालीन परिस्थितीत शिक्षक राष्ट्रीय काम करण्यास अग्रेसर राहणार असून कोव्हिड काळात सेवा बाजवणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका मालवणच्या वतीने गटविकास अधिकारी यांचेकडे करण्यात आली. कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यात प्राथमिक शिक्षकांना विविध कामगिरी देण्यात आली आहे.सदर काम करण्यास शिक्षक एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तयार असून त्यांच्या समस्या मात्र दूर कराव्यात असे निवेदन शिक्षक समिती मालवणच्या वतीने आज गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांना देण्यात आले.या निवेदनात कामगिरीवर असणाऱ्या सर्व शिक्षकांना प्राधान्याने लस देण्यात यावी.कामगिरीचे दुबार आदेश रद्द करून एकच जबाबदारी देण्यात यावी.कमकाज पार पडल्यावर जबाबदारी निभावणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात यावे.विमा कवच लागू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचे संकलन नमुना पत्र भरून घेऊन लवकरात लवकर करावे.मुस्लिम बांधवांचे सद्या रमजान या पवित्र सणाचे रोजे चालू असल्याने त्यांना या कालावधीसाठी ड्युटीतून सूट द्यावी व पुढील कालावधीत आदेश बजवावेत.तसेच ड्युटी पूर्ण झाल्यावर परजिल्हयातील शिक्षकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी.अशा समस्या मांडण्यात आल्या. या सर्व बाबींवर गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली.तसेच या सर्व समस्या निराकरण करण्यात येतील अशी ग्वाही दिली.तसेच त्यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना तसे आदेशित केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित,आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी,विस्तार अधिकारी सूरज बांगर शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे,तालुका सरचिटणीस नवनाथ भोळे,जिल्हा संघटक राजन जोशी,तालुका संघटक आरिफ कच्छी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page