दोघांवर गुन्हा: एक लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
ओरोस ता २३
जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ पोलीस ठाणे हद्दीतील दांड्याचे गाळु, सर्वीस रोड मुंबई-गोवा महामार्गा जवळ २२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोवा बनावटीच्या दारुसह एक लाख ८५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत आरोपी मिथुन मंगेश फाटक वय.२९ रा. कट्टा ता.मालवण, महेश शामराव महांकाळ वय.५० रा. तोंडवळी ता. मालवण या दोघांना ताब्यात घेतले असून गोवा बनावटीची दारू, ॲक्टिव्हा, जुपीटर अशी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा, आशिष जामदार, पोलीस अंमलदार महेश्वर समजिसकर यांनी केलेली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो ओळ:- कुडाळ:-
