आचरे येथे उद्या पासून शेळीपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन..

गरजूनी सहभागी होण्याचे समीर लब्दे यांनी केले आवाहन..

⚡मालवण ता.२२-:
कृषी विज्ञान केंद्र किर्लोस मालवण सिंधुदुर्ग यांच्यामार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आचरे विभाग आणि शेतकरी विकास मंच आचरे पंचकोशी यांच्या वतीने शेळीपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत लौकिक सांस्कृतिक भवन आचरा वरची वाडी सिरॉक हॉटेल जवळ ता मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आचरा विभाग प्रमुख श्री समीर लब्दे यांनी दिली आहे

चार दिवस चालणाऱ्या शेळीपालन प्रशिक्षण शिबिरात कोकणात पाळण्यात उपयुक्त शेळ्यांच्या जाती व उत्पादकता, शेळ्यांचे आजार, उपचार व लसीकरण, खाद्य व पाणी व्यवस्थापन, शेळ्यांसाठी घर बांधणी व शेळी घरासाठी जागेची निवड, शेळीफार्म व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, जमाखर्च, शेळ्यांसाठी चारा व वृक्ष लागवडयावर सखोल मार्गदर्शन तर चार दिवस चालणाऱ्या शेळीपालन प्रशिक्षण शिबिरात कोकणात पाळण्यात उपयुक्त शेळ्यांच्या जाती व उत्पादकता, शेळ्यांचे आजार, उपचार व लसीकरण, खाद्य व पाणी व्यवस्थापन, शेळ्यांसाठी घर बांधणी व शेळी घरासाठी जागेची निवड, शेळीफार्म व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, जमाखर्च, शेळ्यांसाठी चारा व वृक्ष लागवडयावर सखोल मार्गदर्शन तर कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिरात परसबागेत पाळण्यात उपयुक्त कोंबड्याच्या जाती व उत्पादकता, कोंबड्यांचे आजार ,उपचार व लसीकरण प्रात्यक्षिकांसह, खाद्य व पाणी व्यवस्थापन, कोंबडी घर बांधणी व कोंबडी घरासाठी जागेची निवड, पोल्ट्रीफार्म व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, जमाखर्च याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे

दोन्ही प्रशिक्षणात प्रत्येकी २५ प्रशिक्षणार्थिना सहभाग देण्यात येणार आहे प्रशिक्षण कालावधीत जेवण, चहा-नाष्टा यांची सोय केली जाणार असून सहभागीना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी आपली नाव नोंदणी साठी संपर्कः समीर लब्दे मोबाईल नंबर 8208026221/9423211672 येथे करावी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आचरा विभाग प्रमुख श्री समीर लब्दे यांनी केली आहे

You cannot copy content of this page