⚡मालवण ता.२२-:
वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा तर्फे देण्यात येणारा “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ हा ;पणदूर येथील ‘संविता आश्रम’ तसेच मुंबई,पालघर,गोवा येथील अनेक आश्रमांतून गोरगरीबांची सेवासुश्रुषा व आधार देण्याचे कार्य करणा-या समाजसेवक संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांना जाहिर झाला आहे. याबाबतची माहिती संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी दिली आहे .
आचरे गावचे सुपुत्र आणि पतसंस्थेचे संस्थापक आणि माजी चेअरमन कै श्रीकांत सांबारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो. सदर पुरस्कार २४ सप्टेंबर रोजी होणा-या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात येणार आहे.
