मालवण ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य शिबिरात २७२ जणांची तपासणी…!

⚡मालवण ता.२२-:
राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा याबाबत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत असून या अभियान अंतर्गत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयात आज महिला व बालके यांच्या तपासणीसाठी रोगनिदान व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिराला महिला, बालके तसेच पुरुषांचाही प्रतिसाद लाभला. यामध्ये ९८ पुरुष व १७४ महिला अशा एकूण २७२ जणांची विविध आजारांसंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तर यानिमित्त मामा वारेरकर नाट्यगृह येथे आयोजित रक्तदान शिबिरात ९ जणांनी रक्तदान केले.

या शिबिराचे उदघाटन यांच्या हस्ते मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, सौ स्मृती कांदळगावकर, मनोज खोबरेकर राजा शंकरदास, सूर्यकांत कदम, दिक्षा लुडबे, श्री. परुळेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत, रोग तपासणी, गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा व हिमोग्लोबिन, क्षयरोग तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माता-बाल सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नोंदणी, आयुष्मान भारत, आयुष्मान वय वंदना कार्ड नोंदणी करण्यात आली. यामध्ये ४४ जणांची आभा कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड नोंदणी करण्यात आली. तर ५५ जणांनी अवयव दान प्रतिज्ञा नोंदणी केली.

या शिबिरासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभले. यामध्ये यात डॉ. संजय पोळ, डॉ. बालाजी पाटील यांच्यासह डॉ. प्रियांका म्हसकर (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. सुशांता कुळकर्णी (बाल रोग तज्ज्ञ), डॉ. नागेश नागवेकर, डॉ. पद्मजा कुंभारवाडकर, डॉ. दीपक वाघ, डॉ. सुमित मोंडकर, डॉ. मेहंदळे, डॉ. अनिता गांवकर, डॉ. संतोष सावंत (माक, कान, घसा तज्ज्ञ), डॉ. शाम राणे (त्वचा रोग तज्ज्ञ), डॉ. जागृती ढोके, डॉ. गणेश शृंगारे, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. निधी (नेत्र तज्ज्ञ), डॉ. समृद्धी कांबळे (दंत शल्य चिकित्सक), डॉ. संदीप खुडे (मानसोपचार तज्ञ), डॉ. कपिल दानी (अस्थीरोग तज्ञ), डॉ. दुर्गेश पांडे (जनरल सर्जन), डॉ. वृषाली माळी यांनी तपासणी केली. तसेच या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या सुपरवायझर परिचारिका देसाई, आरोग्य सहायक विनायक सावंत, कर्मचारी विद्या सावंत, श्रीमती कुबल श्री.पेडणेकर, शितल तेली, श्रीमती बारटके, कनिष्ठ सहायक मिलन वस्त, लॅबचे राहुल साखरे, सुनील खुपसे, संकेत जाधव, श्री. केळूसकर, सुविधा प्रभू, तृप्ती वेंगुर्लेकर आदी व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page