ओरोस ता २३
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, दिव्यांग विभाग व सिंधुदुर्ग जिल्हयातील दिव्यांगांसाठी काम करणा-या शाळा व सर्व अशासकीय संस्था यांचेमार्फत दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी करणेकरीता सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी तालुक्यातील श्री. भगवती सभागृह, रेल्वे स्टेशन रोड मळगाव वृक्षवल्ली शेजारी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, दिव्यांग विभाग व सिंधुदुर्ग जिल्हयातील दिव्यांगांसाठी काम करणा-या सर्व शासकीय शाळा व अशासकीय संस्था यांचेमार्फत दिव्यांग बालकांची ओळख,तपासणी करणेकरीता दिव्यांग बालकांसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये दिव्यांग बालकांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शासकीय योजनांची माहिती व लाभ, दिव्यांग प्रमाणपत्र अदा करणेकरीता वैद्यकीय तपासणी, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड काढणे,नवीन आधार कार्ड काढणे व अद्ययावत करणे तसेच दिव्यांग बालकांसोबत उपस्थित राहणारे शिक्षक व पालक यांचेकरीता आरोग्य तपासणी याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त दिव्यांग बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे.
चौकट
तसेच त्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सौ. संपूर्णा गुंडेवाडी तसेच तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी, कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ व दोडामार्ग या कार्यालयांशी संपर्क साधावा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग या कार्यालयाचा ई-मेल आयडी- dlsa-sindhu@bhc.gov.in, संपर्क क्र.०२३६२-२२८४१४/८५९१९०३६०७, हेल्पलाईन क्रमांक-१५१०० येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
