इर्टिगा कारने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना दिली धडक…!

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एका इर्टिगा कारने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून बसची वाट पाहत असलेल्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाल्याचे समोर येत आहे.

ही इर्टिगा कार आदमापूर, जि. कोल्हापूर येथील बाळूमामा मंदिरातून दर्शन घेऊन परत येत होती. गाडी चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात सातुळी-बावळाट येथील भास्कर परब आणि माडखोल येथील लक्ष्मण गावडे यांच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे. जखमी महिलेला तातडीने सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page