प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचा औचित्य:विशाल परब यांची संकल्पना..
⚡सावंतवाडी ता.२१-: डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २०२५– २६ ची पहिली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ काल सावंतवाडी जिमखाना येथे करण्यात आला. या स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेला आज भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावी स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून श्री सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दिलीप भालेकर सुधीर आडिवरेकर आनंद नेवगी रवी मडगावकर,सिंदुधुर्ग जिल्ह्याचे कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अवदूत भगणे, सदस्य दिलीप वाडकर, सेक्रेटरी योगेश फणसळकर, सदस्य अनिल कम्मर हे उपस्थित होते.
