तळवणे श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम…!

⚡सावंतवाडी ता.२०-: तळवणे येथील श्री देवी माऊली मंदिरात २२ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २२ रोजी सकाळी ८ वाजता श्री देवी माऊलीचे विधीवत पूजन व घटस्थापना,रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धां यामध्ये सहभागी संघ – श्री देवी माऊली भजन मंडळ,सातोसे ( बुवा – अमोल मांजरेकर,महेश शिरोडकर लिंगेश्वर पावणाई भजन मंडळ,कणकवली ( बुवा – योगेश मेस्री,विकास नाईक ) जैन महालक्ष्मी भजन मंडळ,वालावल ( बुवा -भूषण घाडी, दिपक मेस्री ) श्री देवी माऊली भजन मंडळ,साटेली ( बुवा – सत्यनारायण कळंगुटकर, प्रशांत मेस्री ) सद्गगुरु भजन मंडळ,अणसूर ( बुवा – हर्षल मेस्री,कौस्तुभ धुरी ) श्री देव रवळनाथ भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – रुपेश येमकर,गौरव धुरी )श्री देव काजरोबा भजन मंडळ,कवठणी ( बुवा – प्रदिप कवठणकर, शामसुंदर कवठणकर, मंगळवार २३ रोजी रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ,दांडेली आरोस,बुधवार २४ रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांचा हळदीकूंकु कार्यक्रम,रात्री ८ वाजता श्री सातेरी भूमिका महादेव कासारवर्णे पेडणे गोवा यांचा ‘ समईनृत्य ‘रात्री ९ वाजता तालुकास्तरीय फुगडी ग्रुपची जुगलबंदी,गुरुवार २५ रोजी रात्री ९ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ,वालावल यांचा नाट्यप्रयोग, शुक्रवार २६ रोजी रात्री ८ वाजता तालुकास्तरीय दांडिया नृत्य,शनिवार २७ रोजी रात्री ९ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ,तेंडोली रविवार २८ रोजी रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा सामना स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ,लोरे कणकवली बुवा – कु.रिया मेस्री ( पखवाज- मिलींद लाड,तबला-भावेश लाड ) विरुद्ध श्री गजानन भजन मंडळ,हुर्शी देवगड बुवा – साची मुळम ( पखवाज-रितेश पांचाळ,तबला-रुपेश मुळम यांच्यात सामना होणार आहे.
सोमवार २९ रोजी सायंकाळी ४ वाजता गाव मर्यादित रांगोळी स्पर्धा,रात्री ८ वाजता रामकृष्ण हरि संगीत संस्कार गुरुकुल तेंडोली यांचा स्वरसंध्या,मंगळवार ३० रोजी सकाळी ८ वाजता शाळा नं १ येथे शारदोत्सव,बुधवार १ रोजी रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम,गुरुवार २ रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता आरती तीर्थप्रसाद, महाप्रसाद,रात्री ८ वाजता वारकरी भजन,रात्री १० वाजता श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ,मळगाव यांचा नाट्यप्रयोग लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page