⚡सावंतवाडी ता.२०-: मिलाग्रिस हायस्कूल,सावंतवाडी येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदी परिपाठ ,हिंदी दोहे, कथा कथन, कविता गायन, एकपात्री प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.
इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. काव्या अमोलदर्शन कारेकर हिने प्रास्ताविक केले.इयत्ता दहावी शिकणाऱ्या कु. सिद्धी हेमंत नाईक हिने विद्यार्थी मनोगत सादर केले.इयत्ता नववीतील विद्यार्थी कु. निलराज सावंत व शनायज अल्मेडा यांनी सूत्रसंचालन केले,तर सहाय्यक शिक्षक श्री. दत्ताराम नाईक यांनी हिंदी विषयाचे महत्त्व प्रतिपादन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय फादर रिचर्ड सालदाना यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसानिमित्त शुभ संदेश दिला. या कार्यक्रमासाठी प्रशालेचा पर्यवेक्षिका श्री संध्या मुणगेकर व हिंदी विषय अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
