⚡सावंतवाडी ता.२०-: आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार २२ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २२ रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापना,रात्री ७ वाजता आरती दिवे,आरास महिलांसाठी,त्यानंतर भजनाचा कार्यक्रम, मंगळवार २३ रोजी रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी,रात्री ८ वाजता श्री देवी शर्वाणी दांडिया ग्रुप,पार्से गोवा समई नृत्य,श्री सातेरी महिला कलासंघ,कासारवर्णे पेडणे गोवा बुधवार २४ रोजी रात्री ७ वाजता आरती,दिवे आरास महिलांसाठी,रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम गुरुवार २५ रोजी रात्री ७ वाजता आरती,दिवेआरास महिलांसाठी,रात्री ७.३० वाजता श्री कुलदेवता महिला भजन व फुगडी मंडळ,तोरसे गोवा यांचा भजन व फुगडीचा कार्यक्रम,रात्री १० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ,यांचा नाट्यप्रयोग,शुक्रवार २६ रोजी रात्री ७ वाजता आरती,दिवेआरास महिलांसाठी,त्यानंतर भजनाचा कार्यक्रम,शनिवार २७ रोजी रात्री ७ वाजता आरती, दिवेआरास महिलांसाठी,रात्री ९ वाजता गायन स्पर्धा,रविवार २८ रोजी रात्री ७ वाजता आरती,दिवेआरास महिलांसाठी रात्री ७.३० वाजता निसर्गप्रेमी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे कोकणातील देवराई आणि राखणदार या विषयावर मार्गदर्शन,रात्री ९.३० वाजता भक्तीभाव गायनाचा कार्यक्रम,सोमवार २९ रोजी रात्री ७ वाजता आरती,रात्री ९.३० वाजता सखी फुगडी ग्रुप,पावशी त्यानंतर श्री तारादेवी फुगडी संघ,केळूस यांचा जुगलबंदी फुगडीचा कार्यक्रम,मंगळवार ३० रोजी सकाळी ८ वाजता श्री देवी माऊली चरणी लक्ष्मी नारायण ह्रदय व विविध सुक्ता अभिषेक अनुष्ठान व धार्मिक विधी,आरती व तिर्थप्रसाद,रात्री ७ वाजता आरती,रात्री ९.३० वाजता आठवणीतील दशावतार हा सुमधूर संगीताचा कार्यक्रम,बुधवार १ रोजी सकाळी ८ वाजता लक्ष्मी नारायण याग व अनुष्ठान व कुंकुमार्चन,श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता आरती,तीर्थप्रसाद,महाप्रसाद, रात्री ७ वाजता आरती,त्यानंतर भजनाचा कार्यक्रम,गुरुवार २ रोजी दुपारी २ वाजता चपई नृत्य,दुपारी ३ वाजता शिवलग्न दसरा होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
आरोस माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २२ पासून विविध कार्यक्रम…!
