⚡मालवण ता.२०-:
राज्यात सुरु असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघाच्या वतीने दि. २३ व २४ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय लक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात गाबीत समाज सिंधुदुर्गच्या सर्व जिल्हा व तालुका शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने दिनांक २३ व २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये कुडाळ जिजामाता चौक येथे उपस्थित राहून किमान २ तास धरणे आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात गाबीत समाज पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन…
