राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार श्री. प्रकाश विठोबा कानूरकर यांना जाहीर…!

⚡मालवण ता.२०-:
मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री. प्रकाश विठोबा कानूरकर यांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११. ३०वा. मुंबई नरिमन पॉईंट येथे होणाऱ्या पुरस्कार प्रदान समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री. कानूरकर यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

शिक्षक श्री. प्रकाश कानूरकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून तसेच सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ, सिंधुदुर्ग सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रसारक म्हणून राज्यस्तरीय वेध परिवार सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे. श्री. कानूरकर यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा समाजकल्याण संचनालय पुणे मार्फत व्यसनमुक्ती अभियान राबवल्याबद्दल युवा गौरव पुरस्कार, ज्ञानदीप मंडळ सावंतवाडी मार्फत ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार, ग्लोबल वेलफेअर फौंडेशन, (GMC, INDIA) मार्फत ” नॅशनल एज्यूकेशनल एक्सेलन्स अवॉर्ड, नॅशनल रूरल डेव्हलोपमेंट फौंडेशन, बेळगांवी मार्फत राष्ट्रीय आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार, माधवनगरच्या भ. रा. नाईक प्रतिष्ठान पुणे मार्फत शिक्षण व्रती पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार श्री. कानूरकर यांना जाहीर झाला आहे,

कानूरकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे
संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर,अॅड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर , संचालक मंडळातील इतर पदाधिकारी तसेच मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे , पर्यवेक्षक महेश भाट आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांनी यांनी अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page