ऐश्वर्या काळूशे:मस्जिद मोहल्ला शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात..
कुडाळ : स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी येणारी अनेक आव्हाने स्वीकारली पाहिजेत, तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, असे प्रतिपादन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी कुडाळ मस्जिद मोहल्ला येथे सांस्कृतिक मेळाव्यात केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने कुडाळ शहरातील फातिमाबी मेमोरियल ट्रस्ट आणि फातिमाबी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू सेमी इंग्लिश स्कूल मस्जिद मोहल्ला यांच्या वतीने 17 व्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी श्रीमती काळूसे होत्या यावेळी जेष्ठ उद्योजक्त तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम समाज उत्कर्ष समिती अध्यक्ष मुश्ताक शेख, नगरसेवक अँड राजीव कुडाळकर, अब्दुल रहमान अहमद शेख, नगरसेविका आफ्रिन करोल, फातिमाबी मेमोरियल ट्रस्टचे हमीद शेख, समद शेख, परीक्षक मौलाना अफजल, मौलाना मुकीब, मुख्याध्यापिका सारा जमीर अहमद शेख, रहेमतबी जमील शेख, अनीसा शौकत शेख, आफरिन नासिर शेख, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊ जिल्हा परिषद उर्दू शाळांचे विद्यार्थी शिक्षक पालक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी काळुसे म्हणाल्या, आजचे युगे स्पर्धा युग आहे. डिजिटल युगात वाटचाल करताना विद्यार्थी सतत जागरूक असला पाहिजे. येणाऱ्या स्पर्धेला सामोरे जाऊन त्या स्पर्धात यश कसे मिळेल या दृष्टीने कार्यरत असला पाहिजे. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास सोबत घेऊन वाटचाल केली पाहिजे. फातिमाबी ट्रस्टच्या माध्यमातून गेली सतरा वर्षे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कलागुणाच्या माध्यमातून आपली कला विकसित करण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव घेतले जातात. हे निश्चितच कौतुकास्पद मुलांना प्रेरणा देणारी बाब आहे. भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक शाळेत झाले पाहिजेत. शिक्षणाबरोबरच कला क्षेत्रसुद्धा महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच भविष्यात कलाक्षेत्रात प्राविण्य मिळवताना आवडत्या कलाक्षेत्रात वाटचाल केली पाहिजे.. असे सांगितलेया शाळेच्या ज्या काही गरजा आहेत इतर प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी आमच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केले जातील असे यावेळी श्रीमती काळुसे म्हणाल्या. उद्योजक मुश्ताक शेख यांनी गेली सतरा वर्षे फातिमाबी मेमोरियल ट्रस्ट ही स्वतःच्या खर्चातून शिक्षणाबरोबरच मुलांच्या कलागुणाना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही काम करत आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. शिवाय सर्वांना प्रेरणा देणारे आहे, विशेष म्हणजे या सांस्कृतिक कार्यक्रमात सिंधुदुर्गातील देवगड विजयदुर्ग सावंतवाडी सह अन्य तालुके सहभागी झाले होते. हे विशेष म्हणावे लागेल. सलग 17 वर्षे मुलांच्या कलागुणाना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव घेणे ही साधी गोष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले नगरसेवकअँड कुडाळकर व करोल यांनी शाळेसाठीचे ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्या निश्चितच सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आफरीन शेख व अनिसा शौकतशेख यांनी केले.
