टी ई टी विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करा…

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

⚡ओरोस ता १९-: 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा सक्तीची केली असल्याचा निकाल दिला आहे. या निकालात हस्तक्षेप करून पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी विनंती करणारे पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना देण्यासाठी संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वळवी, सरचिटणीस महेश पालव यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन दिले आहे. यावेळी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर, राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई, राज्य संघटक राजा कविटकर, राज्य महिला सेल प्रतिनिधी वंदना सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मराठे, कोशाध्यक्ष आप्पासाहेब हरमलकर, महिला सेल जिल्हाध्यक्ष तेजस्विता वेंगुर्लेकर, जिल्हा उपसरचिटनिस दत्ताराम सावंत, तालुकाध्यक्ष प्रभाकर पावसकर, यल्लाप्पा दळवी, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, गणेश सुरवसे, रामदास तांबे इत्यादी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page