शिरोडा परिसरात सकाळी गडगडाटासह अवकाळी पाऊस

*💫वेंगुर्ले दि.०७-:* वेंगुर्ले तालुक्यात आज शुक्रवारी शिरोडा गावा सह काही गावांमध्ये सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट करत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तालुक्यात सध्या उष्णतेचे प्रमाण अधिकच वाढले आहे. मात्र अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने वातावरणात थोडासा गारवा निर्माण केला. एन मे महिन्यात अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे अनेकांची मात्र दमछाक झाली. काहींनी घर दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत तर बहुतांशी बागायतदार आपल्या आंबा बागांमध्ये फळे काढण्यात मग्न आहेत. अचानक सकाळपासून वातावरण ढगाळ बनल्याने बागायतदार मात्र चिंतेत पडले. काढलेला आंबा लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी हलविला. परंतु ज्या ठिकाणी या अवकाळी पावसाने हजेरी लावली तेथे मात्र बागायतदारांना थोडे नुकसान सोसावे लागणार आहे. अजूनही तालुक्यात बहुतांशी भागात ढगाळ वातावरण असून अवकाळी पाऊस पुन्हा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

You cannot copy content of this page