मायनिंग व्यवसायामुळे कोरोना पसरत नाही का ?

मनसेच्या सुधीर राऊळ यांचा प्रश्न; जनता कर्फ्यूत मायनिंग राजरोस सुरु

*💫सावंतवाडी दि.०७-:* तालुक्यात संचारबंदी आणि जनता कर्फ्यु सुरू असताना राजरोसपणे मोठ्या प्रमाणात मायनिग सुरू आहे. त्यामुळे कोरोना पसरत नाही का ? असा सवाल मनसे तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे म्हटले आहे की मायनिंग वर काम करणारे कामगार हे वेगवेगळ्या गावातून कामावर येत असतात. ते एकमेकांच्या संपर्कात असतात त्यांना कोरोना संसर्ग होत नाही का? सर्वसामान्य जनतेसाठी जनता कर्फ्यु तर मायनिंग साठी का नाही अस देखील ते म्हणाले आहेत. जनता कर्फ्यु आणि संचारबंदी ही गोरगरीब जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी लावण्यात आला आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे. यावेळी या मायनिग वाहतुकीवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून निर्बंध घालावेत अशी मागणी सुधीर राऊळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page