मालवणात २२ रोजी महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर…!

⚡मालवण ता.१६-:
राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा याबाबत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविले जाणार आहे. या अंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयात दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. महिला व बालके तपासणीसाठी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा महिला व बालके यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. पोळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page