को.म.सा.प. कुडाळ शाखेच्या बैठकीत केंद्रीय सभेचे नियोजन…

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची मासिक सभा प्रा.संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये झाली. २०सप्टेंबला कुडाळ येथे होणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय विभागाच्या वार्षिक सभेच्या आयोजन-नियोजनासह इतर उपक्रमाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेच्या नवीन कार्यकारिणीच्या या पहिल्या सभेला को.म.सा.प.जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, कुडाळ शाखेच्या उपाध्यक्षा प्रा.डॉ.दीपाली काजरेकर आणि सौ.स्नेहा फळसणकर तसेच कार्यवाह सुरेश पवार, सहकार्यवाह स्वाती सावंत, कोषाध्यक्ष गोविंद पवार, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, प्रा.अरूण मर्गज, संदीप साळसकर, अनिल पोवार उपस्थित होते.
कार्यक्रम समिती, युवा प्रतिनिधींची निवड तसेच वर्षभरामधील कार्यक्रमांचे नियोजन सभेत करण्यात आले.तसेच को.म.सा.परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत २० सप्टेंबला कुडाळ येथे होणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय विभागाच्या वार्षिक सभेच्या आयोजन-नियोजनासाठी कुडाळ शाखेचा सहभाग,सहकार्य कोणत्या स्वरुपात असावे याबद्दल अधिक चर्चा होऊन या सभेच्या आयोजन-नियोजनासाठी कुडाळ शाखेची पूर्वतयारी सुरू झाली आहे.
को.म.सा.परिषदेच्या अध्यक्षा नमिता किर यांच्या अध्यक्षतेखाली कोकण मराठी साहित्य परिषदेची केंद्रीय विभागाची वार्षिक सभा कुडाळ येथील मराठा समाज सभागृह येथे होणार आहे. कार्याध्यक्ष प्रा.डॉ.प्रदीप ढवळ,विश्वस्त रमेश किर तसेच मुंबई,नवी मुंबई,पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग अशा एकूण सात जिल्ह्यातील आजीव सभासद या वार्षिक सभेला उपस्थित राहणार असून कुडाळ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर सर्व तालुका शाखा नियोजनामध्ये सहभागी होणार असल्याची मासिक सभेत माहिती देत को.म.सा.प.जिल्हाध्यक्ष श्री.मंगेश मसके यांनीही मार्गदर्शन केले.को.म.सा.प.कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा.संतोष वालावलकर यांनी उपस्थित सर्वांना आयोजन-नियोजनात सस्क्रिय होण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी,उपाध्यक्षा प्रा.डॉ.दीपाली काजरेकर आणि सौ.स्नेहा फळसणकर ,कार्यवाह सुरेश पवार संदीप साळसकर आदींनी मासिक सभेच्या आयोजन -नियोजन चर्चेत सहभागी झाले.आभार गोविंद पवार यांनी मानले.

You cannot copy content of this page