मालवणात १९ रोजी काव्य मैफिल…

⚡मालवण ता.१६-:
मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने आणि अभियान आम्ही मालवणी व दत्त मंदिर भरड यांच्या सहयोगाने कोकणातील मान्यवर कविंची तुफानी काव्य मैफिल दि. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४. ३० वाजता दत्त मंदिर भरड मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.

या काव्य मैफिलीत रायगड भूषण कवी प्रा. एल.बी. पाटील, श्री. संजय गुंजाळ, श्री. गणेश कोळी, ऍड. श्री. गोपाळ शेळके, श्री. पुरुषोत्तन मुळे (सर्व रायगड), श्री. मच्छिन्द्र म्हात्रे (उरण), श्री. लवेंद्र मोकल (पेण), ऍड. श्री. मनोज म्हात्रे (पनवेल), ऍड. श्री. चंद्रकांत मढवी (पनवेल), श्री. अजय शिवकर (उरण), श्री. नरेश पाटील (अलिबाग), जनार्दन संताने (कर्जत), श्री. रुजारिओ पिंटो (सिंधुदुर्ग) आदी कवी सहभागी होणार आहेत. तरी काव्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page