⚡सावंतवाडी ता.१६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून ‘सेवा पंधरावड्याचे आयोजन’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे, त्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी शहर भाजपची बैठक संपन्न झाली. यात मॅरेथॉन स्पर्धा,स्वच्छता अभियान, दिव्यांग व्यक्तींचा सत्कार,चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, असे विविध कार्यक्रमानिमित्त आज चर्चा करत नियोजन करण्यात आले.
या अभियान दरम्यान जिल्ह्याचे सुपुत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा २० सप्टेंबर रोजी येणारा वाढदिवस सुद्धा विविध सेवा उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. त्यांना अपेक्षित असे उपक्रम राबविले जाणार आहेत, असेही भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून स्पष्ट केले.
