⚡मालवण ता.१४-:
लायन्स क्लब मालवण तर्फे मसुरे प्राथमिक शाळा नं. १ चे शिक्षक श्री. विनोद सातार्डेकर यांना तसेच मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक विद्यालयाच्या शिक्षिका सौ. आनंदी घोगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मालवण येथील दैवज्ञ भवन येथे मालवण लायन्स क्लबचा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित लायन्स क्लबचे झोन चेअरमन अमेय पै व ज्येष्ठ लायन्स सदस्य डॉ. शशिकांत झाट्ये यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. शिक्षक श्री. सातार्डेकर व सौ. घोगळे यांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी झोन चेअरमन अमेय पै यांचे लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण यांनी भेटवस्तू देऊन स्वागत केले. मान्यवरांचा परिचय अंजली आचरेकर यांनी करून दिला. लायन्स क्लब मध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल रुजारिओ पिंटो व सहदेव बापार्डेकर यांना पिन व सन्मानपत्र देऊन अमेय पै यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच स्व:खर्चाने उत्तम सेवाकार्य करणाऱ्या अरविंद ओटवणेकर, उमेश शिरोडकर, विराज आचरेकर, जयश्री हडकर, नंदिनी गावकर, सहदेव बापर्डेकर यांना डिस्ट्रिक्ट पिन देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कर्करोग जनजागृती दिनानिमित्त लायन्स क्लबतर्फे कर्करोग जनजागृती पत्रक यावेळी प्रसिद्ध करण्यात आले. सूत्रसंचालन गणेश प्रभूलीकर यांनी केले.
यावेळी क्लबच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, खजिनदार पूनम चव्हाण, डॉ. शशिकांत झाट्ये, रुजारीओ पिंटो,
महेश अंधारी, अरविंद ओटवणेकर, उमेश शिरोडकर, गणेश प्रभुलीकर, राजा शंकरदास, महेश कारेकर, विराज आचरेकर, जयश्री हडकर, स्वप्नाली नेरूरकर, अंजली आचरेकर, नंदिनी गावकर, दीक्षा गावकर, राधिका मोंडकर, मीना घुर्ये तसेच सातार्डेकर व घोगळे कुटुंबिय उपस्थित होते.
