नितेश राणेंचा जनता दरबार हा जनतेची दिशाभूल करण्यासाठी…

रूपेश राऊळ:दीड तासात १४० प्रकरणे कशाप्रकारे निकाली काढू शकता..?

वेंगुर्ला प्रतिनिधी – न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून जनता दरबार होणे गरजेचे होते. वेंगुर्ल्यातील जनता दरबाराचा पूर्ण कार्यक्रम पाहिला असता अवघ्या दीड तासात १४० प्रकरणे कशाप्रकारे निकाली काढू शकता? फक्त निवेदन घ्यायची आणि अधिका-यांकडे द्यायची म्हणजे पोस्टमनच काम तर केलं नाही ना? जनता दरबार हा जनतेची दिशाभूल करण्यासाठी पालकमंत्र्यांनी घेतला असल्याचा आरोप उद्धव सेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेवेळी केला.
वेंगुर्ला येथील शिवसेनेच्या संफ कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेवेळी वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, संजय गावडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्र्यांची केविलवाणी स्थिती ः रुपेश राऊळ
जनता दरबारमधील किती प्रकरणे निकाली काढली? किती प्रकरणे प्रलंबित आहेत? हे सांगणे गरजेचे होते. मात्र असं न करता फक्त ठाकरे कुटुंबियांवर टीका करणे यातून त्यांची झालेली केविलवाणी परिस्थिती लक्षात येते. रविद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पालकमंत्री म्हणून त्यांची केविलवाणी परिस्थिती झाली आहे. वडील आणि हे स्वतः एका पक्षात, भाऊ आणि दीपक केसरकर एका पक्षात यामुळे दोन्ही बाजू सांभाळून घेण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. रविद्र चव्हाण यांनी त्यांची परिस्थिती केविलवाणी केली आहे असल्याचा जोरदार टोलाही रुपेश राऊळ यांनी लगावला आहे.

केसरकरांचे अपयश झाकण्यासाठी जनता दरबार
येणा-या जिल्हा परिषद निवडणुकीत जर पहिले अपयश कुठे येणार तर ते सावंतवाडी मतदारसंघात येईल हे त्यांना माहित असल्याने दीपक केसरकर यांचे अपयश झाकण्यासाठी सावंतवाडी मतदार संघात वेंगुर्ल्यामध्ये हा जनता दरबार पालकमंत्री यांनी घेतला. अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने वेंगुर्ल्यातील जनता नाराज आहे. वेंगुर्ल्यातील लोक अत्यंत नाराज आहेत अनेक पश्न पलंबित आहेत. निवडणूक जवळ आल्याने पालकमंत्री म्हणून यायचं, जनतेसमोर चित्र उभं करून दाखवायचं आणि आश्वासने द्यायची. निवडणुकीनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी यांची परिस्थिती झाले असल्याचा टोलाही राऊळ यांनी लगावला.
जनता दरबारावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून उडवलेली खिल्ली अत्यंत चुकीची आहे. सुशिक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत वक्तव्य करताना विचारपूर्वक करणे गरजेचे होते. असा बालिश पालकमंत्री यापूर्वी कधीच झाला नाही, असे तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी सांगितले.
फोटोओळी – वेंगुर्ला येथील पत्रकार परिषदेत रूपेश राऊळ यांनी वक्तव्य केले.

You cannot copy content of this page