मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा…!

⚡सावंतवाडी ता.१४-: मिलाग्रीस हायस्कूलमध्ये दिनांक 13 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले शुभेच्छा कार्ड भेट म्हणून दिले.
इंग्रजी प्रायमरीच्या व मराठी प्रायमरीच्या चिमुकल्यांनी अतिशय सुंदर असा डान्स सादर केला. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अप्रतिम असे नृत्य सादर केले तर हायस्कूलच्याच विद्यार्थ्यांनी सुंदर नाटिका देखील सादर केली. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या वतीने स्पॉट प्राईज व विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते.सर्व विद्यार्थ्यांनी आपले वर्ग शिक्षक दिनाच्या धर्तीवर सजविले होते.त्रिशा परब हिने विद्यार्थिनी मनोगत सादर केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी शुभसंदेश दिला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील कु.विराज राऊळ,कु.सिद्धी नाईक,कु.कृष्णा पास्ते, कु. रूथ डिसोझा,कु भार्गवी शेटवे, कु. तनया सावंत व राजस मुळीक यांनी केले.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

You cannot copy content of this page