हनुमान मंदिरातील शिबिरात ९० लहान मुलांची आरोग्य तपासणी

⚡मालवण ता.१३-:
मालवण बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हाँस्पिटल झाट्ये क्लिनिक यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात १८ वर्षाखालील ९० लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर सर्व वयोगटातील ३८ व्यक्तींचे आयुष्यमान कार्ड मोफत करण्यात आले तसेच गरजू व्यक्तींना मोफत औषध वाटप करण्यात आले.

श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने डॉ.अमोल झांट्ये आणि अंकुर हाँस्पिटल झाट्ये क्लिनिक यांचे आभार मानले तसेच सहकार्य करणाऱ्या आभार मानले.

हनुमान मंदिरात मंगळवार दि. १६ सप्टेंबर धक्का मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आणि गुरुवार १८ सप्टेंबर रोजी डॉ.गद्रे हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. याचा गरजूनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page