कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी घेतला कोरोना संदर्भात प्रत्येक जिल्ह्याचा आढावा

*💫सावंतवाडी दि.०६-:* कॉंग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वलाखे यांनी काल झूम ऍप द्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा सोबत चर्चा करून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा जाणून घेतला आहे. तसेच यावेळी त्यानी प्रत्येक जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी महिलांच्या कामासंदर्भात देखील आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी कोरोना काळात करत असलेल्या कामाबाबत जिल्हाध्यक्षाचे कौतुक केले आहे. त्याच सोबत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ साक्षी वंजारी यांचे त्यानी विशेष कौतुक केले आहे.

You cannot copy content of this page