*💫बांदा दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, हुबळी आदी भागांत कावीळ औषधांसाठी प्रसिद्ध असलेले सावंतवाडी तालुक्यातील दांडेली येथील वैद्य महादेव राघोबा बिरोडकर (८४) यांचे बुधवारी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महादेव बिरोडकर यांनी आपल्या जीवनात लोकांची सेवा करण्यासाठी भर दिला. झाडा पानांपासून एखादा रुग्ण बरा करण्याची कसब त्यांच्यात होती. त्यांच्या हाताला गुण असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, हुबळी येथूनही लोक उपचारासाठी यायचे. त्यांच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण दांडेली गावावर शोककळा पसरली आहे. वैद्य सतीश बिरोडकर यांचे ते वडील होत.
वैद्य महादेव बिरोडकर यांचे निधन…
