तृप्ती धोडमिसे जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी…

अनिल पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वीकारणार पदभार..

ओरोस ता २६
विद्यमान जिल्हाधिकारी अनिल पाटील ३१ ऑगस्ट रोजी रिक्त होत असल्याने रिक्त होणाऱ्या जागेवर सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. १ सप्टेंबर पासून तृप्ती धोडमिसे जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची २ सप्टेंबर २०२४ रोजी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अनिल पाटील यांची शासनाने नियुक्ती केली होती. अनिल पाटील हे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी शासन कोणाची नियुक्ती करते ? याकडे लक्ष लागून होते. जिल्ह्यात यापूर्वी काम केलेले मनोज रानडे आणि मंगेश जोशी या दोघांची नावे नवे जिल्हाधिकारी म्हणून चर्चेत होती. त्यामुळे याबाबत उत्सुकता लागून होती.
शासनाने मंगळवारी आदेश काढत सांगली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तृप्ती धोडमिसे यांना पदोन्नती देत त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदी नियुक्ती केली आहे. तृप्ती धोडमिसे या ३१ ऑगस्ट रोजी विद्यमान जिल्हाधिकारी अनिल पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

फोटो:- तृप्ती धोडमिसे

You cannot copy content of this page