संदिप गावडे यांचा उपक्रम:भजनी मंडळांनी मानले गावडे यांचे आभार..
⚡सावंतवाडी ता.२५-: गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भजनी मंडळांना प्रोत्साहन देऊन. सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्याच्या हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संदिप गावकडे यांच्यामार्फत भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. सावंतवाडी शहर व आंबोली मंडलातील एकूण ५० मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी, ॲड. परिमल नाईक, जिल्हाबँक संचालक रवी माडगावकर, सावंतवाडी खरेदीविक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे,आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, माजी जिल्हापरिषद सदस्य पंढरी राऊळ, पंकज पेडणेकर आदी मान्यवर तसेच सावंतवाडी व आंबोली मंडल मधील सर्व भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते.