⚡मालवण,ता.२६-:
उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आज सायंकाळी रूट मार्च काढला. गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांना सतर्कतेचा संदेश देण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता.
हा रूट मार्च मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आला. यामध्ये शहरातील प्रमुख मार्गांचा समावेश करण्यात आला होता. भरडनाका येथून सुरू झालेला हा रूट मार्च बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ येथे संपला. यावेळी पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे यांच्यासह २० पोलीस कर्मचारी आणि १८ होमगार्ड उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात पोलिसांचा संचलन…
