सावंतवाडी तालुक्यात देखील बेकायदा दारू, मटका, जुगार राजरोस पणे सुरू…

आशिष सुभेदार:पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकून पोलीस खात्याचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला..

⚡सावंतवाडी ता.२३-:
कणकवली येथे मटका जुगार अड्ड्यांवर पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले यातून त्यांच्याच प्रशासनातील पोलीस खात्याचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. सावंतवाडी तालुक्यात देखील बेकायदा दारू, मटका, जुगार राजरोस पणे सुरू असून यात काही धंदे त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी यांचे आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस पालकमंत्री राणे दाखविणार का असा सवाल सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी केला आहे.
कणकवली येथे खुलेआम सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकत कारवाई केली. ही कारवाई खुद्द पालकमंत्री यांनी करून त्या अंड्यावरील सर्वांना यांचा जाब विचारला. सदर राणे यांच्या धडक कारवाई नंतर एकच खळबळ उडाली आणि या कारवाईचे समर्थन देखील होत आहे त्याबद्दल पालकमंत्री यांचे अभिनंदनच आहे. मात्र अशा प्रकाराची कारवाई फक्त कणकवली पुरता मर्यादित न राहता ती सावंतवाडी व अन्य तालुक्यामध्ये देखील व्हावी अशी जनतेची मागणी आहे. सावंतवाडी तालुका गोव्याच्या सीमेवरील तालुका आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर दारू, मटका जुगार अड्डे, मटका कंपनी स्थापन करून अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. वारंवार पोलीस प्रशासनाला कल्पना देऊन देखील त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. या सर्व बाबींना जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असून हे धंदे बंद कधी होणार त्यांच्यावर कारवाई होईल की नाही याबाबत साशंकता कमीच आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील मटका जुगार कारवाईमुळे यापुढे तरी कारवाई होईल अशी आशा आहे परिणामी सावंतवाडी येथील मटका जुगार कंपन्यानवर कारवाई केली जावी ते करण्याचे धाडस पालकमंत्री राणे दाखविणार का असा सवाल उबाठा प्रवक्ते सुभेदार यांनी केला आहे. सावंतवाडी तालुक्यात राजरोसपणे मटका जुगार सुरू आहे. बहुतांशी टपऱ्यावर हा जुगार चालतो कारवाईच्या भीतीपोटी हल्ली ऑनलाईन जुगार खेळला जात आहे. सावंतवाडीत काही मटका जुगार कंपन्या तर पालकमंत्री नितेश राणे यांच्याच पक्षातील पदाधिकारी यांच्या स्वमालकीच्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता तरी कारवाई होणार का असा सवाल सुभेदार यांनी केला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दारू अड्डे, मटका कंपन्या, जुगार, अवैध धंदे, बेकायदा वाळू उपसा असे धंदे सुरूच आहेत त्यावर पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही आता राणे यांनी कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा. गोव्याच्या सीमेवरून होणारी चोरटी वाळू वाहतूक, दारू वाहतूक, कर्नाटकात जाणारी बेकायदा दारू तसेच अमली पदार्थ विक्री यांच्यावर पालकमंत्री कारवाई करणार का असे ही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page