संजू परब: शिवसेनेत बाळा नाईक यांनी केला आज जाहीर प्रवेश..
⚡सावंतवाडी ता.२३-: दोडामार्ग पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे पदाधिकारी बाळा नाईक यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजु परब यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत करत नाईक यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल अशी ग्वाही संजू परब यांनी दिली.
आम्हाला आव्हान देणाऱ्यांना हे प्रत्युत्तर असल्याचे परब म्हणाले. यावेळी दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस ,राजू निंबाळकर ,शिवसेना विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई ,विशाल तळवडेकर ,शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे ,गजानन नाटेकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .